रोजच्या धावपळीच्या दिनक्रमातून तुम्हाला थोडा बदल हवा आहे का? राज्यात थंड हवेची अनेक ठिकाणे आहेत. तुम्ही या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता आणि हवाहवासा निवांतपणा अनुभवू शकता.
आंबोली
आंबोली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या टेकड्यांमध्ये वसलेले आंबोली हे हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी वर्षभर हिरवळ पाहायला मिळते.
सातपुडा पर्वतरांगामध्ये समुद्रसपाटीपासून ३७७० फूट उंचीवर वसलेल्या तोरणमाळ या गिरिस्थानावर निसर्गाचा वरदहस्त आहे. इथे टेकडीवर 'तोरणा' देवीचे मंदिर असून त्यावरूनच तोरणमाळ असे नाव पडल्याचेही मानले जाते.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरी येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात शेकडो लोक ध्यानसाधनेसाठी येत असतात.
लोणावळा आणि तिथून अवघ्या तीन किमी अंतरावर असणारे खंडाळा ही दोन थंड हवेची ठिकाणे कित्येक पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या ठिकाणी असलेली प्राचीन लेणी आणि धबधबे पाहणे, ही निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच असते.
मुंबईपासून १८५ किमी आणि अहमदनगर पासून १५५ किमी अंतरावर असणारे भंडारदरा, हे कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरापासून हाकेच्या अंतरावर आहे. धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा यामुळे इथल्या मूळच्या निसर्गसौंदर्यात भर पडली आहे.
तलाव, धबधबे आणि दऱ्यांच्या मधोमध वसलेला माळशेज घाट, हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या निसर्गरम्य परिसरातली भटकंती तुमचा सगळा थकवा अगदी चुटकीसरशी दूर करेल.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध असून उन्हाळ्याबरोबरच हिवाळ्यातही या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हा अविस्मरणीय अनुभव असतो.
पाच टेकड्यांनी वेढलेल्या पाचगणी या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिरिस्थानी वर्षभर आल्हाददायक आणि शांत वातावरण असते. शुद्ध हवा, शांत वातावरण आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा यामुळे मुख्य शहरांपासून जवळ असणारे हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती ठरते.
मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई हे ठिकाण आपल्या निसर्गसौंदर्याने अनेक पर्यटकांना भुरळ घालते. वाईमध्ये श्रीशंकर आणि गौरीपुत्र विनायकाचे देवस्थान प्रसिद्ध असून त्याच्या दर्शनासाठी दर वर्षी अनेक भाविक गर्दी करतात.
सुमारे २५००० एकर क्षेत्र व्यापणारे लवासा हे सुनियोजित शहर तब्बल ७ डोंगरांवर पसरले आहे. स्पा, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मॉल्स, वॉटरस्पोर्ट अशा अनेक सुखसोयींनी सुसज्ज असणारे लवासा पर्यटकांच्या दृष्टीने नंदनवन आहे.
औरंगाबाद पासून ४० किमी अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून १०६७ मीटर उंचीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण 'मराठवाड्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. म्हैसमाळचा प्रसन्न निसर्ग पावसाळ्यात खऱ्या अर्थाने बहरून येतो.
कोल्हापूर पासून साधारण ५५ किमी अंतरावर असणारे गगनबावडा हे पश्चिम घाटातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. डोंगरमाथ्यावरच्या निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच इथल्या श्री गगनगिरी महाराजांच्या मठाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.
मुळशी - ताम्हिणी या गावांच्या दरम्यान १५ किमी क्षेत्रावर पसरलेल्या सुंदर पर्वतरांगा म्हणजेच ताम्हिणी घाट. वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती येथे पाहता येतील.
समुद्रसपाटीपासून १११८ मीटर उंचीवर असणारे चिखलदरा हे वर्षभर उष्ण तापमान असणाऱ्या विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. महाभारत ह्या महाकाव्यात चिखलदरा या ठिकाणाचा उल्लेख आढळतो.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबई पासून १०० किलोमीटर दूर असून समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर आहे. माथेरान ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ 'माथ्यावरचे वन’ म्हणजेच पर्वतांवर असणारे जंगल असा होतो.
मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा पन्हाळा गड, गडकिल्ल्यांनी समृद्ध असणाऱ्या महाराष्ट्राचे वैभव आहे. ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिरे यामुळेही पन्हाळा पर्यटक आणि प्रामुख्याने तरूणाईसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
महाअधिवक्ता कार्यालयातील निर्लेखित केलेल्या वाहनाची विक्री करणेबाबत...
+अधिक
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने वर्तमानपत्रांमध्ये...
+अधिक
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत अर्ज मागविण्यासंबंधीचे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा वर्ष 2023-24 चे पुरस्कार व पुस्तक प्रकाशन अनुदानसाठी प्रवेशिका...
+अधिक
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा करार पद्धतीने नामिकासुची तयार करण्यासाठी अर्ज मागविणेबाबत...
+अधिक
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे शासनाच्या वतीने “सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता” पदांवर नियुक्ती करण्यासाठी...
+अधिक
डिजिटल माध्यम मार्गदर्शक सूचना - २०२३ प्राथमिक...
+अधिक
सहकार,पणन व वस्त्रोद्योग या विभागामार्फत निर्लेखित करण्यात आलेले शासकीय वाहन क्रमांक एमएच-०१-एएन-४०४१ (होंडा सिटी ) ची विक्री करण्यासंदर्भातील जाहिरात...
+अधिक
विवक्षित स्वरुपाची कामे करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभाग (खुद्द) मंत्रालय, मुंबई साठी संगणक, प्रिंटर्स व स्कॅनर दुरुस्तीकरीता दरपत्रक उपलब्ध करुन...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ३ वाहने विक्री करणे...
+अधिक
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती वर्ष...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकरीत Tally TS९ Version खरेदी करण्याबाबत...
+अधिक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय - सेवा करार जाहिरात...
+अधिक
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची रिक्त पदे...
+अधिक
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक MH - 01 - AN-7474 विक्रीसाठी फेरनिविदा...
+अधिक
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे वाहन क्रमांक Mh - 01 - AN-7474 च्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या व नाकारलेल्या निविदांची...
+अधिक
मंत्रालयीन कवींचे कवितांचे दिनांक 26 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित कार्यक्रमासाठी...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई अंतर्गत सेवा दवाखाना चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध...
+अधिक
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अपर संचालक (वेतनश्रेणी -एस-27: 123100-215900) या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून करारपध्दतीने नियुक्ती...
+अधिक
शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहन ताफ्यातील वाहनांच्या दुरुस्तीकरिता लागणारे सुटे भाग खरेदी करिता दरपत्रके मागविण्याबाबतची...
+अधिक
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार सोसायटी मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना , महात्मा गांधी स्मारक रुग्णालय,परेल, चारकोप कांदिवली व चेंबूर येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील कंत्राटी...
+अधिक
शासकीय /निमशासकीय सेवेतूर गट अ (ग्रेड वेतन रु.7,600/- पेक्षा कमी) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींग यंत्रणा खरेदी करण्याकरीता दरपत्रक मागविण्याकरीता...
+अधिक
नागरी संरक्षण, रत्नागिरी / सिंधुदुर्ग कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीवर उपनियंत्रक पदासाठी...
+अधिक
अंशकालीन विशेषज्ञ यांची मुलाखती द्वारे पदभरती जाहिरात...
+अधिक
राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील कार्यरत अध्यक्ष व सदस्यांची...
+अधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाची...
+अधिक
सेवानिवृत्त गट - ब (अराजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याची करार पद्धतीने नियुक्ती करणे...
+अधिक
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामध्ये गट "क " मधील रिक्त पदांसाठी जाहिरात...
+अधिक
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठीची मुदत दिनांक 11/09/2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्या करीता सुधारित जाहिरात...
+अधिक
शासकीय/ निमशासकीय सेवानिवृत्त लघुलेखकांची सेवा करार पध्दतीने...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.