तुमच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलची लिंक देण्याची इच्छा असेल तर आमची हरकत नाही. हे पोर्टल महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांची आणि त्या विभागांमार्फत प्रदान केल्या जाणार्या सेवांची माहिती प्रदान करते.
आमच्या लिंकिंग धोरणानुसार, तुमच्या संकेतस्थळावरून www.maharashtra.gov.in ची लिंक देण्यासाठी कोणत्याही पूर्व-परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळावरून तुम्ही या पोर्टलची लिंक दिली असेल तर 'अभिप्राय' हा पर्याय वापरून तुम्ही आम्हाला त्याबाबत सूचित करावे ही विनंती, जेणेकरून, आमच्या या पोर्टलवर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या बदलांबाबत आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकू. तसेच तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या पोर्टलवरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडली पाहिजेत.
आमच्या पोर्टलची लिंक देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ग्राफिक बॅनरमधून आवडेल तो पर्याय निवडू शकता. यापैकी कोणताही बॅनर तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर ठेवू शकता आणि त्याद्वारे www.maharashtra.gov.in ची लिंक देऊ शकता.
डाउनलोड करण्यासाठी बॅनर
तुमच्या संकेतस्थळावर वापरण्यासाठी खालीलपैकी कोणतीही प्रतिमा डाउनलोड करता येईल. www.maharashtra.gov.in या पोर्टलचा प्रचार करण्यासाठी आणि लिंक देण्यासाठीच खाली दिलेल्या बॅनर प्रतिमांचा वापर केला जाऊ शकतो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्याही घटकाला समर्थन किंवा मान्यता म्हणून या प्रतिमांचा वापर करता येणार नाही, हे कृपया लक्षात असू द्या. बॅनरची प्रतिमा योग्य प्रकारे दिसावी, विद्रूप दिसू नये, यासाठी प्रत्येक बॅनरवर नमूद केल्याप्रमाणे रचना वैशिष्ट्यांचे पालन करावे, ही विनंती.
डाउनलोड करण्यासाठी लोगोवर क्लिक करा: |
डिझाइन तपशील |
|
हाय - डेफिनिशन मोठा लोगो
(1024px x 1024px) |
|
मोठा लोगो
(512px x 512px) |
|
मोठा काळा आणि पांढरा लोगो
(512px x 512px) |
|
लहान लोगो
(250px x 250px) |