अ.क्र. |
सेवांची नांवे |
1 |
सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा योजनेच्या औपचारिक सेवा व्यवस्थापनामध्ये आणण्यासाठी वैयक्तिक अथवा गट-नळ जोडण्या देणे. (स्थानिक स्वराज्य संस्था) |
2 |
वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करुन देणे. (ग्रामपंचायत) |
3 |
ग्राहकास विविध कालावधीने व परिणामासह पाणी-देयके ऑनलाईन / विहित वेळेत घरी पोहोचविणे. |
4 |
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांने मागणी केल्यास, त्यांच्याकडे विविध आर्थिक तरतुदींनुसारच्या कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनां यांची अंदाजपत्रके व आराखडे शासनाने निर्दिष्ट केलेले शुल्क आकारुन तयार करुन देणे. |
5 |
स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागणी केल्यास त्यांच्याकडील विविध आर्थिक तरतुदींनुसारच्या कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची अंदाजपत्रके व आराखडे यांचे शासनाने निदिष्ट केलेले शुल्क आकारुन तांत्रिक मान्यता / तांत्रिक मुल्यांकन करुन देणे. |
6 |
विंधन विहीरींकरीता सर्वेक्षण करुन देणे. |
7 |
वाळू उत्खनानाकरीता सर्वेक्षण करुन देणे. |
8 |
भूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र देणे. |