माननीय उपमुख्यमंत्री, श्री अजित अनंतराव पवार

श्री. अजित अनंतराव पवार
नाव
:
श्री. अजित अनंतराव पवार
जन्म दिनांक
:
२२ जुलै १९५९
जन्म ठिकाण
:
देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर
शिक्षण
:
बी. कॉम.
ज्ञात भाषा
:
मराठी, हिंदी आणि इंग्रजी
वैवाहिक माहिती
:
विवाहित, पत्नी सौ. सुनेत्रा
अपत्ये
:
२ मुले - कु. पार्थ व कु. जय
व्यवसाय
:
शेती
पक्ष
:
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
मतदार संघ
:
२०१ - बारामती, जिल्हा पुणे

राजकिय कारकिर्द

 • लोकसभा सदस्य : १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१.
 • विधानसभा सदस्य : १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९ व नोव्हेंबर, २००९ मध्ये फेरनिवड.
 • उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा) - ११ नोव्हेंबर २०१० ते २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत.
  ७ डिसेंबर २०१२ पासून आजपर्यंत.
 • मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा - दि. ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१०
 • मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता - दि.९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९.
 • मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) - दि. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४.
 • मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन - दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३.
 • राज्यमंत्री, जलसंधारण, ऊर्जा व नियोजन - नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३.
 • राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि उर्जा २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२.

इतर माहिती

 • विश्र्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती.
 • संचालक :
  • छत्रपती शिक्षण संस्था , भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा पुणे,
  • श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे,
  • माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे,
  • सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे,
  • वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे,
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, पुणे,
  • महाराष्ट्र राज्य सह.दूध उत्पादक संघ, जिल्हा पुणे.
 • माजी संचालक :
  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
  • महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
 • अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ व डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८
 • अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक - ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९
 • अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन - २६ मार्च २०१३ पासून
 • अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - सप्‍टेंबर २००५ पासून ६ मार्च २०१३.
 • अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन - १३ ऑगस्ट २००६ पासून
 • अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ - २८ सप्टेंबर २००६ पासून
परदेश प्रवास
बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वीत्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा
छंद
क्रिकेट, टेनिस व समाजकार्य

कायमचा पत्ता

मु.पो.काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
'सहयोग' बंगला, बारामती, जिल्हा पुणे
०२११२ - २२६०००

शासकीय निवासस्थान

'देवगिरी',
नारायण दाभोळकर मार्ग,
मलबार हिल,
मुंबई ४००००६.
२३६३ १६०६ / २३६३ ४८७७
२३६२१६१२

कार्यालयीन पत्ता

उपमुख्यमंत्री कार्यालय,
६ वा मजला, मंत्रालय,
मुंबई - ४०० ०३२
२२०२ २४०१ / २२०२ ५०१४
२२०२४८७३